Peoples Media Pune header

Go Back

*मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या संस्कारांचा वारसा शिवसेना पुढे नेत आहे : ना. डॉ. नीलम गोऱ्हे* २६ व्या स्मृती दिनानिमित्त पुणे शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेना भवन पुणे येथे केले अभिवादन

06 Sep 2022

पुणे, ता. ६ : मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या संस्काराने शिवसेना आपली वाटचाल करीत आहे. त्यांच्या या शिदोरीवरच प्रत्येक संकटांचा सामना मोठ्या नेटाने होईल यात शंका नाही. हा वारसा शिवसैनिक सातत्याने नेत आहेत, असे मत आज विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केले. त्या म्हणाल्या, मीनाताई ठाकरे यांचे अतिशय प्रेमाचे, श्रद्धेचे सहृदयतेचे संस्कार महाराष्ट्रातील संपूर्ण शिवसेना परिवार आणि शिवसेना महिला आघाडी तसेच शिवसैनिकांवर झालेले आहेत. त्यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात रुग्णालये, वाचनालये सुरू आहेत. या माध्यमातून अनेक शहरे आणि गावांमध्ये वाचन संस्कृती जोपासली जाते. रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात होत आहे. खोपोलीजवळ असलेल्या रमाधाम येथेही चंदुमामा वैद्य हे ज्येष्ठ नागरिकांची अविरत सेवा गेली अनेक वर्षे करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही मासाहेबांच्या संस्कारांची आठवण ठेवून आपले काम करीत आहेत. मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर, २०२२ रोजी शिवसेना भवन, पुणे येथे मासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी छ्त्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना पुणे संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, संजय गवळी, महिला आघाडीच्या प्रमुख सविता मते, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, स्वाती ढमाले, श्रुती नाझिरकर, युवासेना सचिव शर्मिला येवले, कार्यालय प्रमुख मकरंद पेठकर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन महिला आघाडीच्या पुणे शहर संघटक सविता मते, संगीता ठोसर यांनी केले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite