Peoples Media Pune header

Go Back

गुलाबबाई संगमनेरकर यांची श्रद्धांजली सभा व त्यांच्या स्मृतीस आदरांजली म्हणून लावणी कार्यशाळेचे आयोजन*

17 Sep 2022
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा व नृत्य परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने विठाबाई नारायणगावकर पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ लोक कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांच्या निधनास्तव पुण्यातील लावणी कलाकारांच्या उपस्थितीत श्रद्धांजली सभेचे आयोजन बुधवार दिनांक 21/ 9 /22 रोजी सकाळी अकरा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले आहे . स्वर्गीय गुलाबबाई या तमाशा क्षेत्रातील एक अग्रणी व मातब्बर कलाकार राहिल्या आहेत .त्यांची गायन व नृत्यकला ही आद्वितीय स्वरूपाची होती .महाराष्ट्रभर त्यांच्या लावणीला प्रेक्षक, समीक्षक आणि रसिकांनी डोक्यावर घेतली होती. त्यांचे नृत्य व गायन याबरोबरच गाण्यांमधील त्यांची अदाकारी हीदेखील तितकीच प्रसिद्ध होती सह्याद्री वाहिनीवरील एका कार्यक्रमात त्यांच्या अदाकारीचे कौतुक भारतरत्न लतादीदींनी देखील केले होते.लावणी क्षेत्रातील त्यांच्या या अतुल्य कामगिरीबद्दल अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.. ज्यामध्ये राज्य शासनाचा जीवन गौरव पुरस्कार, पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार आणि नुकताच तमाशा क्षेत्रातील मानाचा मानला जाणारा महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार ह्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.हे सारे अतिउच्च सन्मान प्राप्त गुलाबबाई यांचे निधन ही लोककलावंतांच्या कुटुंबावर अतिव दुःख देणारी घटना आहे .घरंदाज गायिकेचा अंत या निमित्ताने घडला आहे .स्वर्गीय गुलाबबाईंचे कार्य व कला सदोदीत तेवत ठेवणे हा हेतू लक्षात घेऊन लावणी क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या अनुभव शिदोरीस नवीन तसेच ,आत्ताच्या रंगभूमीवर लावणी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नृत्यांगनांकरिता लावणी विषय कार्यशाळा आयोजन करण्यात आयोजित करण्यात आली आहे .लावणी क्षेत्रातील व्यवसाय ,त्याचे सादरीकरण ,वेशभूषा ,पदन्यास , रंगभूषा आदी विषयांवर महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, राष्ट्रपती पदक विजेत्या कलाकार माया खुटेगावकर ,ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, ज्येष्ठ लावणी कलाकार संगीता लाखे, स्व.गुलाब बाई यांच्या कन्या वर्षा संगमनेरकर आदी कलाकार आपल्या अनुभवाचे संचित नवकलाकारांसाठी रीता करणार आहेत. पुणे शहरातील व महाराष्ट्रातील लावणी शिकण्यास उत्सुक तरुण-तरुणींसाठी ही पर्वणी ठरणार आहे .सदर कार्यशाळा विनामूल्य स्वरूपात असून लावणी सम्राज्ञीकडून लावणी शिकण्याची संधी प्राप्त होणार आहे. ज्यास वयाचे कोणतेही बंधन नसणार आहे .आपल्या सहभागासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे .सदर श्रद्धांजली सभा व लावणी कार्यशाळेचे आयोजन हे नृत्य परिषद व नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष श्री .मेघराज राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य परिषदेचे कार्याध्यक्ष व नाट्य परिषदेचे कार्यकारणी सदस्य श्री जतिन माया पांडे व नाट्य परिषद पुणे शाखेचे कार्यकारणी सदस्य शशिकांत कोठावळे हे करीत आहेत . सहभागास्तव आपण त्यांना संपर्क साधू शकता . कृपया सदर वृत्त आपल्या वर्तमानपत्रात छायाचित्रासह प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही विनंती .

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite