Peoples Media Pune header

Go Back

रोटरीचे प्रांतपाल डॉ.अनिल परमार यांच्या हस्ते श्रेष्ठ रक्तदान खोलीचे उद्घाटन.

25 Sep 2022

रोटरीचे प्रांतपाल डॉ.अनिल परमार व डॉ.हेमा परमार यांनी रोटरी क्लब ऑफ पुणे फॉरच्यूनच्या सहयोगाने “श्रेष्ठ”रक्तदान खोलीचे व अॅम्ब्युलंसचे उद्घाटन इंडियन सेरोलॉजिकल इंस्टिट्यूट नवी पेठ येथे केले. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दीपक तोष्णीवाल यांनी ७२ वे रक्तदान केले. कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब पुणे फॉरच्यूनचे अध्यक्ष निखिल टकले,सचिव श्रीकांत मडघे,खजिनदार सारिका रोडे,शिल्पा तोष्णीवाल आय एस आय रक्तपेढीच्या ट्रस्टी रचना देशपांडे,प्रिथा देशपांडे,असित शहा,शिरीष प्रभू आदी  मान्यवर उपस्थित होते.  

छायाचित्र : डावीकडून हेमा परमार,अनिल परमार,दीपक तोष्णीवाल,निखिल टकले.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite