Peoples Media Pune header

Go Back

बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार.

27 Sep 2022

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही बांधकाम क्षेत्रातील सर्वात जुनी संस्था असून १९४१ साली पुण्यात स्थापन झाली आहे. संस्थेच्या भारतभर २०० पेक्षा अधिक शाखा असून त्यात पुणे शाखा ही नाविन्यपूर्ण समाजोपयोगी कार्यक्रम वेळोवेळी सादर करीत आहेत. यावर्षी पुणे सेंटरने कामगारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्याचे ठरविले आहे. जी मुले/मुली ९वी/१०वी/११वी मध्ये उत्तम गुणसंखेत उत्तीर्ण झाली आहेत अशा मुलांचा सत्कार महात्मा गांधी जयंती -२ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्याचे ठरविले आहे. अशा १०० मुलांना स्मार्ट वॉच (किमत  ३५०० रु) व प्रशास्ती पत्र देण्यात येणार आहे. वरील कार्यक्रमास कामगार सहआयुक्त श्री अभय गीते हे प्रमुख पाहुणे असून श्री भगवान देवकर(अखिल भारतीय बिल्डर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष)सन्माननीय अतिथी म्हणून आहेत,तसेच प्रा.अंजली परांजपे संस्थापक डोअर स्टेप स्कूल या सन्माननीय अतिथी आहेत. आपल्या अनुभवाचा फायदा व मार्गदर्शन मुलांना व्हावे या उद्देशाने सर्व पाहुणे व वक्ते यांना निमंत्रित केले आहे. तसेच मुलांचे पालक ही निमंत्रित आहेत. अशा प्रकारचे कार्यक्रम यापूर्वी कोणत्याही संस्थेने घेतलेला नसून अशा प्रकारचे कार्यक्रम इतर बांधकाम संस्थांनी घ्यावेत अशी अपेक्षा आहे. या सत्कारामुळे मुलांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या पालकांनाही शिक्षणाचे महत्व कळावे हा उद्देश आहे.सत्काराचा कार्यक्रम फिरोदिया ऑडिटोरियम इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स या ठिकाणी होणार असून वेळ सायंकाळी ६ ते ८ असा आहे.यानंतर भोजनाचा कार्यक्रम होवून हा समारंभ संपन्न होईल.   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite