Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब फिनिक्सने केला भिक्षा मागणे सोडून रोजगार करणार्या महिलांचा नारळ व साडीने ओटी भरून सन्मान.

01 Oct 2022

शारदीय नवरात्र उत्सवात आरती,गरबा व अन्य धार्मिक उपक्रम करण्यात येतात. महिलांची ओटी भरून सन्मान करण्याची प्राचीन परंपरा आहे. याला अनुसरून रोटरी क्लब फिनिक्सने  भीक मागणे सोडून अन्य रोजगार करणार्‍या महिलांना ५४ साड्या देवून त्यांचा नारळ व साडीने ओटी भरून सन्मान केला.बेगरस डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर अभिजीत सोनावणे यांच्या पुढाकाराने शनिवारवाडा प्रांगणात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी  डॉ.अभिजीत सोनवणे,रोटरी क्लब फिनिक्सच्या अध्यक्ष प्रज्ञा डांगे,प्रोजेक्ट डायरेक्टर मानसी खुर्जेकर,अनुपमा जोशी,गायत्री शेडबाळकर,अश्विनी सरनोबत,प्रदीप डांगे,इंद्रजीत सरनोबत आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र : महिलांचा ओटी भरून सन्मान करताना प्रज्ञा डांगे.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite