Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब सहवास कडून आधार मंडळ मुकबधीर शाळेस साडेसत्तेचाळीस लाखांच्या मदत प्रकल्पाचे हस्तांतर

27 Feb 2017

रोटरी क्लब सहवास व रोटरी क्लब चार्जीन व्ह्यॅली(ओहायो स्टेट अमेरिका)यांच्या संयुक्त विद्यमाने आधार मंडळ मूक बधीर स्कूल,बिबवेवाडी यांना सुमारे साडेसत्तेचाळीस लाख रुपयांच्या प्रकल्पांचे हस्तांतरण करण्यात आले.यात स्कूल बस,कॉम्पुटर लॅब,नवीन स्वच्छतागृह,ऐकण्याची अत्याधुनिक यंत्रे,इत्यादींचा समावेश होता.पीवायसी हिंदु जिमखाना येथे प्रांतपाल प्रशांत देशमुख व रो.अरविंद रुईकर(अध्यक्ष रोटरी क्लब सहवास),यांच्या हस्ते श्रीरंग उमराणी यांना हस्तांतर करण्यात आले.या प्रसंगी प्रकल्प प्रमुख सुषमा हर्डीकर(डायरेक्टर ग्लोबल ग्रांट,प्रकाश अवचट (सेक्रेटरी),रो.सुनील विसपुते,रो सी.एल.कुलकर्णी आदी मान्यवरांच्या बरोबरच माजी प्रांतपाल,पदाधिकारी व रोटेरियन मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना प्रांतपाल प्रशांत देशमुख यांनी रोटरी ही संस्था गरजवंतांच्या नेमक्या गरजा हेरून त्यानुसार मदत करते असे सांगितले.अरविंद रुईकर यांनी बोलताना असे अजून काही प्रकल्प राबविण्याचा मानस असल्याचे सांगितले.श्रीरंग उमराणी यांनी बोलताना या मदतीमुळे विशेष मुलांच्या प्रगतीस हातभार लागेल असे सांगितले.

छायाचित्र :मदतीचे प्रतीकात्मक हस्तांतर करताना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite