Peoples Media Pune header

Go Back

कॅफे यू एन मी च्या शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन.

29 Oct 2022

कॅफे यू एन मी च्या शाखेचे उद्घाटन सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. खजिना महाल,एस पी कॉलेज समोर झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी कॅफे चालक सचिन कट्टे पाटील,हनुमंत घारगे,माजी स्थायी समिति अध्यक्ष हेमंत रासने,कॅफे यू एन मी च्या संस्थापक रत्नावली इंगळे,जस्ट फॉर आंत्रप्रिनरचे विशाल मेठी,वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदुलकर,वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने,अश्विनी माने,सचिन कट्टे पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना रत्नावली इंगळे यांनी महिलांनी स्वतः व्यवसायात आत्मनिर्भर व्हावे या साठी अशा उद्योजकांना प्रोत्साहन देणार असल्याचे संगितले. सुषमा चव्हाण यांनी बोलतांना महिलांनी उद्योग व्यवसायात प्रगति करून त्याचा विस्तार ही केला पाहिजे असे संगितले व शुभेच्छा दिल्या.

छायाचित्र : डावीकडून सचिन कट्टे पाटील,हनुमंत घारगे,रत्नावली इंगळे,अश्विनी कट्टे पाटील,सुषमा चव्हाण,सुनील माने,अशोक इंदलकर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite