रोटरी क्लब प्राईडने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त मिलिंद मुळीक यांच्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते त्यात मिळालेले,२५१०००/-(दोन लाख एक्कावन हजार) उत्पन्न सोल्जर्स इंडिपेंडन्ट रिहॅबिलीटेशन फाउंडेशन (SIRF)च्या सुमेधाताई चिथडे यांना चेक प्रदान करण्यात आला. पुण्यातील १० रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सुमंत मुळगावकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा प्रदान करण्यात आला.या प्रसंगी सुमेधाताई चिथडे यांचे सैनिकांच्या जीवनावर विषयावर उत्कट व्याख्यान झाले। यात त्यांनी जवान हे त्यांचे सर्वस्व बलिदान देतात. त्यामुळे त्यांचे स्मरण व आदर केला पाहिजे असे संगितले.या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब प्राईड,लोकमान्य नगर,विज्डम,सारसबाग,सहवास,युनिव्हार्सिटी,पाषाण,गणेशखिंड,हेरिटेज या क्लबांचे अध्यक्ष,पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
छायाचित्र : सुमेधाताई चिथडे यांचा मदत प्रदान करतांना मान्यवर. .
© 2011. Peoples Media Pune