Peoples Media Pune header

Go Back

ग्लोबल वॉर्मिंग मुळे झालेल्या विस्थापित नागरिकांना फक्त नुकसान भरपाई मिळते,त्यांचे शाश्वत पुनर्वसन होत नाही.: ना.डॉ.नीलमताई गो-हे

16 Nov 2022

जागतिक तापमान वाढीमुळे अनेक नैसर्गिक आपत्ती उदा.पुर,कडे कोसळणे रोगराई इत्यादी यामुळे अनेकदा नागरिकांचे स्थलांतर केले जाते.मात्र या नागरिकांना फक्त नुकसान भरपाई दिली जाते त्यांचा शाश्वत विकास केला जात नाही असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले.त्या डेव्हलपमेंट सपोर्ट टिम आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “हवामान बादलाचा महिलांच्या आरोग्यावरील परिणामांविषयी” आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या,तसेच फक्त तापमान वाढ या एकाच बाबीवर लक्ष केंद्रीत न करता त्यावर परिणाम करणार्‍या बाबींवर सुद्धा विचार केला पाहिजे असे पुढे संगितले. मराठा चेंबर्सच्या सेनापती बापट संकुलात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मिटिरियालॉजीचे शास्त्रज्ञ डॉ.रॉक्सी मॅथ्यू,डेव्हलपमेंट सपोर्ट टिमच्या कार्यकारी विश्वस्त श्रीमती हरविंदर उर्फ मिनी बेदी या मान्यवरांच्या बरोबरच विविध संस्थांचे सदस्य उपस्थित होते.या प्रसंगी डॉ.रॉक्सी मॅथ्यू,यांनी दृक श्राव्य सदरीकरणातून या बाबत सखोल माहिती दिली. या प्रसंगी डॉ मॅथ्यूयांनी वातावरण बदलाच्या अनुषंगाने नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम बाबत ३ ते ५ महीने आगोदर माहिती देता येवू शकते असे संगितले.त्यामुळे प्रशासनास साथीच्या रोगाबाबत पूर्व कल्पना मिळाल्याने यावरती नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन करता येवू शकते यावर भर दिला. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite