Peoples Media Pune header

Go Back

रोटरी मिडटाऊनने प्रेमलीला विठ्ठ्ल कन्याशाळेस प्रदान सुविधांचे महापौरांचे हस्ते उद्घाटन

21 Mar 2017

रोटरी क्लब मिडटाऊनच्या वतीने एसएनडीटी मधील प्रेमलीला विठ्ठ्लदास कन्याशाळेस विविध सुविधा प्रदान केल्या त्याचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते करण्यात आले.या सुविधांमध्ये ८ स्वच्छतागृहाचे नूतनीकरण,ई लर्निंग प्रोजेक्ट,पिण्याच्या पाण्यासाठी नळ,सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन, व डिस्पोजल मशीन,४ सीसी टीव्ही,ग्रंथालय साहित्य आदींचा समावेश होता.सर्व प्रकल्प सुमारे ५ लाख ७० हजार रुपये.या प्रसंगी प्रांतपाल प्रशांत देशमुख,रो.मुकुंद कमलाकर(अध्यक्ष रोटरी क्लब मिडटाऊन),डॉ.आनंद जुमले(मुख्य कार्यकारी अधिकारी),स्मिता निंबाळकर(मुख्याध्यापिका),प्रा.सुरेंद्र निरगुडे,रो.पराग सुरा (सेक्रेटरी),रो.शितल पटवर्धन,समीर मोहिरे(प्रकल्प प्रमुख),रो.शैलेश टिळक,माधुरीताई सहस्रबुद्धे ,आदी मान्यवर व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.या प्रसंगी बोलताना मुक्ताताई टिळक यांनी मुलीनी सर्व प्रकारचे क्षेत्रातील शिक्षण घेतले पाहिजे असे सांगितले.प्रशांत देशमुख यांनी बोलताना रोटरी शिक्षण,आरोग्य व अन्य क्षेत्रात अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबवीत आहे असे सांगितले.मुकुंद कमलाकर यांनी बोलताना आगामी काळातही अन्य सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे असे सांगितले.

छायाचित्र :उद्घाटनप्रसंगी मुक्ताताई टिळक मुकुंद कमलाकर,प्रशांत देशमुख, आदी मान्यवर

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite