Peoples Media Pune header

Go Back

गरजू व दिनदुबळे यांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा. –आध्यात्मिक गुरु विद्यावाचस्पती विद्यानंद.

17 Nov 2022

दिनदुबळे व गरजू यांची सेवा करणे,त्यांच्या अडचणी दूर करण्यास मदत करणे हीच ईश्वर सेवा आहे. सध्या तंत्रज्ञानाने प्रगती झाली असे वाटते मात्र माणूस एकमेकांपासुन दूर होत गेला आहे. यात समाजमध्यमे ही काही अंशी जबाबदार आहेत. सामाजिक कार्य करण्यासाठी संघटित पणे काम करणा-या मानवसेवा - मानिनी या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे”. असे प्रतिपादन आध्यात्मिक गुरु विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी केले. ते मानवसेवा - मानिनी संस्थेने आयोजित राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्याक्रमात विविध जाती धर्मातील ४० प्रमुखांचा शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.  पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे नुकत्याच संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी फादर मायकेल,माजी अति आयुक्त ज्ञानेश्वर मोळक,अध्यक्ष आशियाखंड ओबेसिटी संघटना श्रीहरी ढोरे पाटील,मानवसेवा मानिनीच्या अध्यक्ष संगीता पिंगळे,कार्याध्यक्ष दिलीप आबनावे,संस्थापक अध्यक्ष अल्ताफ पिरजादे,खजिनदार रियाज पिरजादे,आदी मान्यवर तसेच सत्कारार्थी व कुटुंबिय उपस्थित होते.

छायाचित्र : मार्गदर्शन करताना विद्यावाचस्पती विद्यानंद. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite