Peoples Media Pune header

Go Back

रोटरी प्रांत ३१३१ च्या वतीने तळजाई टेकडी येथे “प्लॅस्टिक मुक्त टेकडी अभियान”

20 Nov 2022

रोटरी प्रांत ३१३१ पर्यावरण टिमच्या वतीने तळजाई टेकडी येथे “प्लॅस्टिक मुक्त टेकडी” आभियान राबविण्यात आले.यात सहभागी सदस्यांनी टेकडीवरील प्लॅस्टिक बाटल्या,पॅकिंग साहित्य,प्लॅस्टिक पिशव्या व अन्य असा कचरा जमा केला. या कार्यक्रम प्रसंगी भावी प्रांतपाल मंजु फडके,रोटरी प्रांतच्या पर्यावरण डायरेक्टर सोनिया शिकारपूर,सहाय्यक प्रांतपाल संतोष परदेशी,माजी प्रांतपाल दीपक शिकारपूर,पुणे महानगर पालिकेचे उपआयुक्त माधव जगताप,रोटरी क्लब अध्यक्ष निखिल टकले,प्रकाश सुथार,सुखानंद जोशी,समीर शास्त्री,भूषण कुलकर्णी,स्वाति मुळे,पद्मजा जोशी,मृणाल नेर्लेकर,तसणीम बास्टा  आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी आणि रोटरॅक्ट सदस्य,एन.एसएस सिंहगड कॉलेज सदस्य उपस्थित होते.या ठिकाणी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले.प्लॅस्टिक मुक्त अभियानात सुमारे २०० जणांनी सहभाग घेतला.  

छायाचित्र : अभियानातील सहभागी मान्यवर व सदस्य. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite