Peoples Media Pune header

Go Back

आचार्य सम्राट आनंदऋषीजी म.सा.यांच्या पुण्यस्मरणार्थ नेत्र तपासणी शिबीर

02 Apr 2017

राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषीजी म.सा.यांच्या २५ व्या पुण्यस्मरण दिना निमित्त पुण्यातील जय आनंद ग्रुपच्या वतीने नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी,मोफत चष्मेवाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले.साळवेगार्डन शांतीनगर सोसायटी शेजारी व्हीआयटी चौक येथे झालेल्या या शिबिरात सुमारे ५०० नागरिकांचे नेत्र तपासणी करण्यात आली,२५० नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले तर ९० नागरिकांना मोतीबिंदू ऑपरेशन साठी पाठविण्यात आले.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज धोका,सचिव प्रमोद छाजेड,कार्याध्यक्ष शांतीलाल नवलखा,खजिनदार किशोर छाजेड,सहसचिव संजय कटारिया नगरसेवक प्रवीण चोरबोले,नगरसेवक बाळासाहेब ओसवाल,नगरसेविका अनुसयाताई चव्हाण,रामदास साळवे,विजयकुमार मर्लेचा,डॉ.पारस शहा,मीनाताई ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना प्रवीण चोरबोले यांनी डोळे हा अत्यंत महत्वाचा अवयव आहे त्याच्या किरकोळ तक्रारीकडे नागरिक दुर्लक्ष करतात.त्यामुळे काहीवेळा गंभीर त्रास होऊ शकतो.म्हणून वेळीच उपचार महत्वाचे असे सांगितले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite