Peoples Media Pune header

Go Back

कलाक्षेत्रमच्या पोंगल महोत्सवाच्या बक्षिसांची निवड अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते संपन्न.

01 Feb 2023

पोंगल निमित्त कलाक्षेत्रम आयोजित ४५ दिवसीय पोंगल महोत्सवात सुमारे १० हजार पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला.यातील १० भाग्यवान महिलांसाठी पैठणी साडी भेटच्या बक्षिसांची निवड अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी कलाक्षेत्रमचे मुख्य प्रतिंनिधी सागर पासकंटी यांनी पोंगल महोत्सव व त्यामागचा उद्देश याची माहिती दिली.या कार्यक्रम प्रसंगी सागर पासकंटी,रोहन आयतम,सचिन गरदास,हितेश आयतम,संतोष आयतम,विलास सातपुते,अंबर क्षिऱसागर,सुप्रिया ताम्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलतांना तेजस्विनी पंडित यांनी पैठणी साडी हा महिलांचा आवडीचा विषय असून कोणत्याही वयाची महिला यात शोभून दिसते असे संगितले.

छायाचित्र : तेजस्विनी पंडित व मान्यवर.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite