कोंढवा येथील मीनाताई ठाकरे मॅटरनिटी हॉस्पिटल येथे बेबी वॉर्मर संचचे रोटरी क्लब ऑफ पुणे युवा व डिस्ट्रिक्ट ३१३१ यांच्या सहकार्याने द रोटरी फाउंडेशनच्या ग्लोबल ग्रांट योजने अंतर्गत लोकार्पन करण्यात आले. मुदतीपूर्व प्रसूत झालेल्या बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे मृत्यू होवू नये यासाठी हा बेबी वॉर्मर संच प्रदान करण्याचा कार्यक्रम आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते पार पडला. सदर कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ पुणे युवाचे अध्यक्ष सत्यजित निगडे,सचिव गोपाल निर्मल,अस्मिता निगडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.भेंडे,हाजी फिरोज,रईस सुंडके,आबा रोकडे,संजय लोणकर,आल्ताफ,जावेद पठाण,अजित लोणकर,सचिन कापरे,निखिल लोणकर,अमजद पठाण,जाकिर शेख,डॉ.सुलेखा आदी मान्यरांच्या बरोबरच हॉस्पिटल कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
छायाचित्र : लोकार्पन प्रसंगी चेतन तुपे सत्यजित निगडे व अन्य.
© 2011. Peoples Media Pune