Peoples Media Pune header

Go Back

“माणसांनी निर्सगाशी कुस्ती-मस्ती करू नये,तर दोस्ती करावी”गिरीश बापट

16 Apr 2017

 निसर्ग हा बलवान आहे,व तोच मानवी जीवनाचा आधार आहे.त्याला प्रदूषण करून दुषित करणे,निसर्गविरोधी कृती योजना करून निसर्गाशी कुस्ती करू नये.तर निसर्गाशी दोस्ती करून पर्यावरण पूरक विकास करावा.यासाठी खनिज तेलावर चालना-या वाहनां एवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा.असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.ई-ड्राईव्ह या इलेक्ट्रिक शक्तीवर चालणा-या रिक्षा-टेम्पो-व मालवाहतूक गाड्यांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.स्वप्नशिल्प हॉल येथे सायंकाळी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी खा.श्रीरंग अप्पा बारणे,मा.नगरसेवक अभय छाजेड,निरंजन दाभेकर(E-Drive),मयूर कडू(E-Drive),तानाजी शिंदे(अतिरिक्त आयुक्त पीसीएमसी),बाळासाहेब दाभेकर(ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते),संदीप पाटील(अभिनेते),ईशा अग्रवाल आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.मालवाहतूक करणा-या वाहनाची क्षमता १ टन आहे.व प्रवाशी वाहतूक करणा-या वाहनाची क्षमता ५ प्रवाशी आहे.तीन तासात चार्ज झाल्यावर हे वाहन १०० किमी प्रवास करते.ग्रामीण भागात ही वाहने विशेष उपयुक्त असून शेतकरी ही याचा लाभ घेवू शकतात असे वितरक निरंजन दाभेकर व मयूर कडू यांनी यावेळी सांगितले

छायाचित्र:इलेक्ट्रिक वाहनाचे उद्घाटन करताना गिरीश बापट,निरंजन  दाभेकर,मयूर कडू,संदीप पाटील व अन्य  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite