Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब स्पोर्टसिटीचे सेरा-वेरा पुरस्कार प्रदान संपन्न.

01 Mar 2023

रोटरी क्लब स्पोर्ट सिटीच्यावतीने सेवा उत्कृष्ठता(सर्व्हिस एक्सलंस-सेरा) पुरस्कार हॉकी कोच श्रीधर कुलकर्णी यांना प्रमुख पाहुण्या डॉ रजनीताई इंदुलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर विशेष विद्यार्थ्यांना संगीत शिकवणारे दत्तात्रय भावे यांना व्यावसायिक गुणवत्ता(व्होकेशनल एक्सलंस-वेरा) पुरस्कार डॉ.रजनीताई इंदुलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. बालकल्याण संस्था गणेशखिंड मार्ग येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब स्पोर्टसिटीचे अध्यक्ष सँम्युअल केनेडी,सचिव भुपेंदर शेठी आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य,विशेष मुलेमुली व पालक उपस्थित होते. डॉ.राजेश पवार यांनी प्रमुख पाहुणे डॉ.रजनी इंदुलकर यांचा परिचय करून दिला.  यावेळी बोलताना डॉ. रजनीताई इंदुलकर यांनी पूर्वी खेळ व संगीत याला दुय्यम मानले जावून प्रोत्साहन मिळत नसे मात्र आता नुसते प्रोत्साहनच नाही तर ते उदरनिर्वाहाचे साधन सुद्धा बनले आहे,हे स्वागतार्ह आहे असे संगितले. या कार्यक्रमात विशेष मुलांनी उत्तम गायन वादन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.    

छायाचित्र : डावीकडून सँम्युअल केनेडी,श्रीधर कुलकर्णी,दत्तात्रय भावे,डॉ.रजनीताई इंदुलकर,भुपेंदर शेठी. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite