Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब शिवाजीनगरचे सामाजिक सेवाकार्य पुढीलही अनेक वर्ष समाजाची सेवा करीत राहील.- प्रांतपाल डॉ.अनिल परमार.

08 Mar 2023

रोटरी क्लब शिवाजीनगरने केलेली सेवाकार्य या वर्षीपुरते नाही तर आगामी अनेक वर्ष सुरू राहून समजाच्या गरजा पूर्ण करीत राहील.जसे रुग्णवाहिका (अॅम्ब्युलन्स),नवजात शिशु साठी बेबी वॉर्मर व अन्य. असे प्रतिपादन रोटरीचे प्रांतपाल रो.डॉ.अनिल परमार यांनी केले. रोटरी क्लब शिवाजीनगरच्या सेवाकार्याचा आढावा प्रसंगी ते बोलत होते. हॉटेल अविस्मरा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल रो.डॉ.अनिल परमार,सहाय्यक प्रांतपाल रो.तनुजा मराठे,रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षा रो.डॉ.मृणाल नेर्लेकर,सचिव प्रमोद पाठक आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी व कुटुंबिय उपस्थित होते. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कापडी पिशवी घरोघरी ह्या उपक्रमाचे उद्घाटन या प्रसंगी झाले.

छायाचित्र : डावीकडून संतोष मराठे,चंद्रशेखर महाजन,डॉ.मृणाल नेर्लेकर,डॉ.अनिल परमार,कु गॅब्रियल(फ्रांस). . 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite