Peoples Media Pune header

Go Back

क्रिप्स फाउंडेशनच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा सत्कार.

09 Mar 2023

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी बजावलेल्या कर्तुत्ववान महिलांचा क्रिप्स फाउंडेशन पुणेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पल्लवी जैन(कृष्णा डायग्नोस्टिक)होत्या,आयोजक क्रिप्स फाऊंडेशनचे सचिव ईश्वर कृपलाणी,क्रिप्स फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर फेरवाणी व अन्य मान्यवर उपस्थित होते. शाल श्रीफळ,मानपत्र व क्राऊन असे पुरस्काराचे स्वरूप होते. सत्कारित महिला पुढील प्रमाणे. आशा ओसवाल(रत्ने),गीता इसराणी(सामाजिक कार्यकर्त्या),आरती पाटील(शिक्षण क्षेत्र),शितल रांका(उद्योजक),राजश्री पारख( उद्योजक),पल्लवी जैन(कृष्णा डायग्नोस्टिक),मिता शाह(क्रिप्स फाउंडेशन),ईश्वरी गुलराजाणी (सामाजिक कार्यकर्त्या),चंदा विराणी(उद्योजक). कार्यक्रम प्रसंगी बोलताना क्रिप्स फाऊंडेशनचे सचिव ईश्वर कृपलाणी यांनी महिला सर्वच क्षेत्रात उत्तम कार्य करीत असून त्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना अधिक मोठे कार्य करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी या कार्यक्रमाची सुरुवात केली असून या उपक्रमाचे चौथे वर्ष असल्याचे प्रतिपादन केले.   

छायाचित्र : डावीकडून आशा ओसवाल,गीता इसराणी,आरती पाटील,शितल रांका,राजश्री पारख,पल्लवी जैन,मिता शाह,ईश्वरी गुलराजाणी,चंदा विराणी  . 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite