Peoples Media Pune header

Go Back

अखिल दत्तवाडी कुस्ती स्पर्धेचा मानकरी पै.मुन्ना झुंजूरके.

20 May 2017

अखिल दत्तवाडी उत्सव कमिटीच्या वतीने आयोजित भव्य कुस्ती स्पर्धा चिंचेची तालीमचे पै.मुन्ना उर्फ तानाजी झुंजूरके यांनी जिंकून चांदीच्या गदेचे मानकरी ठरले.द्वितीय क्रमांक हनुमान आखाड्याचे पै. अमर आटोळे यांनी मिळवला.याप्रसंगी उपहिंद केसरी पै.अभिजित कटके यांना पुण्य नगरीची शानहा पुरस्कार प्रदान करण्यात आला.तपोभूमी मैदान येथे झालेल्या या  स्पर्धा प्रसंगी आयोजक पै.निलेश गायकवाड,बाळासाहेब दाभेकर,नगरसेवक – सचिन दोडके,महेश लडकत,धीरज घाटे,महेंद्र पठारे,मा.विनयक हणमघर,मा.धनंजय जाधव,अभिषेक मोरे, अविनाश तरवडे,किरण गंजकर,शशिकांत काळे,श्रीकांत जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.गेली सात वर्ष या स्पर्धा भरविण्यात येतात असे आयोजक पै.निलेश गायकवाड यांनी नमूद केले.

छायाचित्र :पै.मुन्ना झुंजुरके यांना चांदीची गदा प्रदान करताना मान्यवर  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite