Peoples Media Pune header

Go Back

१५ ते १९ वर्षांच्या युवकांच्या विकाससाठी रोटरीच्या "रोटरी युथ एक्स्चेंज'उपक्रमची महितीसाठी मोफत कार्यशाळा.

21 Mar 2023

तरुणांच्या मानसिकतेवरून कुठल्याही देशाची प्रगती ठरते. तरुण वर्ग जर गुणी, अभ्यासू, आरोग्यपूर्ण आणि चारित्र्यसंपन्न असेल तर देश झपाट्याने प्रगती करतो. अर्थात याचा अर्थ कोणी असा काढला, की फक्त शास्त्रज्ञ, अभियंते आणि डॉक्टर्समुळेच ही प्रगती होते तर तो मोठा गैरसमज आहे. देशातला मोठा तरुण वर्ग आव्हान स्वीकारणारा. इतरांना समजून घेणारा आणि धडाडीचा असेल, तर त्याचा देशाच्या प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात सिंहाचा वाटा असतो. अर्थात दुर्दैवाने हे वरील गुण विकसित करण्यासाठी आपल्याकडे तरी असाअभ्यासक्रम किंवा मार्गदर्शन उपलब्ध नाही, पण रोटरीने मात्र हा विचार फार पूर्वीच केला आणि अंमलातही  आणला आहे. जागतिक तरुण वर्गासाठी रोटरीने, रोटरी युथ एक्सचेंज प्रोग्रॅम अशा योजनेखाली मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे, हा सांस्कृतिक देवाणघेवाणीचा कार्यक्रम दोन देशांमध्ये राबवला जातो आणिहा कार्यक्रम १५ ते १९ वर्ष वयोमर्यादा असणार्‍या मुला मुलींसाठी खुला आहे.ह्या कार्यक्रमाची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात का ?   अधिक माहिती हवी आहे? आर्थिक अटी किंवा उलाढाली काय आहेत? कोण सहभागी होऊ शकते आणि केव्हा? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध आहे , डिस्ट्रिक्ट ३१३१ ने आयोजित केलेल्या कार्यक्रममध्ये २६मार्च रविवारी मोडक हॉल, ललित महल हॉटेल समोर, फर्ग्युसन कॉलेज रोड येथे,वेळ सकाळी ८.३० ते ११.३०  तेही विनाशुल्क! परंतु नाव नोंदणी मात्र आवश्यक आहे.लिंक https://forms.gle/cQtab6DFzGFdQUh7  रजिस्ट्रेशन लिंक साठी संपर्क साधा रोटेरियन अंकुश पारख +919923102117   वेबसाईट – Rye3131.org        टीप  :- हाच कार्यक्रम २ एप्रिल रोजी पिंपरी येथे होणार आहे.       

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite