Peoples Media Pune header

Go Back

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सी एन सी राऊटरचे टेक्नोगार्ड एंटरप्राईजेस येथे उद्घाटन.

23 Mar 2023

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सी एन सी राऊटर(हायटेक लेझर ईनग्रेव्हर)चे उद्घाटन टेक्नोगार्ड एंटरप्राईजेस येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यवसाय मार्गदर्शक दिलीप औटी यांच्या हस्ते  करण्यात आले. न-हे येथील कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी कंपनीचे चालक संजय कदम,अभिषेक कदम,भागीदार आशा कदम,कोमल औटी,जॅक मेडिकोचे रमेशभाऊ शेवाळे,मंगल शेवाळे,वसंती मुळजकर आदी मान्यवरांच्या बरोबरच महाराष्ट्रातील उद्योजक व व्यावसायिक मोठ्या संखेने उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना दिलीप औटी यांनी कंपनीचे चालक संजय कदम हे कुठलेही शिक्षण न झाल्याने अशिक्षित असतांना देखील उद्योग उभारणी करून जर्मन,इस्रायल आदी देशांबरोबर व्यवसाय करून परकीय चलन ही मिळवीत आहेत. असे संगितले. संजय कदम यांनी बोलतांना आगामी काळात ४० ते ५० कोटी पर्यन्त व्यवसाय विस्तार करण्याचा मानस असल्याचे संगितले. अभिषेक कदम यांनी टेक्नोगार्ड ही कंपनी फूड पॅकेजिंग मशीन्स साठी सुरक्षा गार्ड तयार करीत असून आणखी काही उत्पादने निर्मितीची योजना असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक ईनामदार यांनी केले.   

छायाचित्र : उद्घाटन करतांना दिलीप औटी,संजय कदम,अभिषेक कदम,रमेशभाऊ शेवाळे,व अन्य.   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite