Peoples Media Pune header

Go Back

रोटरीच्या वतीने फुलराणी सिनेमाचा प्रिमियर शो संपन्न.

25 Mar 2023

रोटरी क्लब विज्डम,रोटरी क्लब हेरिटेज,सिंहगड रोड,रोटरी क्लब मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी सिनेमा फुलराणीचा प्रिमियर शो आयोजित करण्यात आला. सिटी प्राईड कोथरूड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी प्रांत ३१३१चे प्रांतपाल डॉ.अनिल परमार,नियोजित प्रांतपाल मंजु फडके,शीतल शहा,वैशाली वरणेकर,अभिनेता सुबोध भावे,अस्मिता पाटील व प्रियदर्शनी इंदलकर आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी,सदस्य व कुटुंबिय असे सुमारे १०५० जण उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना सुबोध भावे व प्रियदर्शनी इंदलकर यांनी चित्रपटा विषयी प्रेक्षकांनी आपली मते आम्हाला कळवावीत असे आवाहन केले.वैशाली वरणेकर यांनी सर्वांनी एकत्र यावे या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे संगितले. 

छायाचित्र : सुबोध भावे यांचा सत्कार करतांना मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite