Peoples Media Pune header

Go Back

“रोटरी युथ एक्स्चेंज” डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने तरुणांना महितीसाठी मोफत सेमिनारचे रविवारी २ एप्रिल रोजी पिंपरी येथे आयोजन.

28 Mar 2023

रोटरी युथ एक्स्चेंज डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने रविवार दिनांक २ एप्रिल रोजी पिपरी कम्युनिटी सेंटर येथे संध्याकाळी ४ ते ७ वाजता युवकांना रोटरी युथ एक्स्चेंज उपक्रमाची माहिती देण्यासाठी मोफत सेमिनारचे आयोजन केले आहे. यात माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी,रोटरी युथ एक्स्चेंज २३ -२४ चे डायरेक्टर दीपक बोधनीव अन्य मान्यवर युवकांना या कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. जागतिक तरुण वर्गासाठी रोटरीने रोटरी युथ एक्स्चेंज प्रोग्राम अशा योजनेसाठी युवकांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे,हा संस्कृतिक देवांघेवाणीचा कार्यक्रम दोन देशांमध्ये राबवला जातो,आणि हा कार्यक्रम १५ ते १९ वयोमार्यादा असणार्‍या मुला मुलींसाठी खुला आहे. ह्या कार्यक्रमाची अधिक माहिती,आर्थिक अटी किंवा उलाढाली काय आहेत ?कोण सहभागी होवू शकते आणि केव्हा ?या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि तज्ञांचे मार्गदर्शन या कार्यक्रमात दिले जाणार आहे. असाच कार्यक्रम २६ मार्च रोजी मोडक हॉल येथे घेतला गेला यात ५५ -६० जणांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. लिंक http://forms.gle/cQtab6DFzGFdQUh7 रजिस्ट्रेशन लिंक साथी संपर्क साधा रोटरीयन अंकुश पारख 919923102117 वेबसाईट Rye3131.org   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite