Peoples Media Pune header

Go Back

भारतात ‘देखभाल-दुरुस्ती संस्कृती’ वाढवेल स्वयंरोजगाराच्या संधी – संजय गांधी यांचे प्रतिपादन

10 May 2023

सध्याच्या ‘युज अॅन्ड थ्रो’च्या काळात भारतातील ‘देखभाल-दुरुस्ती संस्कृती’च वाढवेल स्वयं रोजगाराच्या अनेक संधी असे प्रतिपादन अॅसपायर नॉलेज आणि स्किल्सचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संजय गांधी यांनी केले. ऐस्टोर इलेक्ट्रॉनिक्स आणि मल्टीब्रँड मोबाइल रिपेअर स्टुडीओ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रिसर्च पार्क फौंडेशन यांच्यात नुकत्याच ‘लेटर ऑफ इंटेन्ट’वर (एलओआय) स्वाक्षऱ्या रिसर्च पार्क फौंडेशनच्या कार्यालयात झाल्या. त्यासमयी संजय गांधी, समिधा गांधी आणि रिसर्च पार्क फौंडेशनचे डॉ. अरविंद शाळीग्राम उपस्थित होते. करारा अंतर्गत मोबाइल दुरुस्ती क्षेत्रात तरुणांना व्यावसायिक मार्गदर्शन, सोफ्टवेअर तंत्रज्ञान, साहित्य यादी, उत्पादनात वाढ काशी करायची, ग्राहक कसे मिळवायचे, दुकानाची मांडणी, ब्रॅडिंग कसे करायचे, सूक्ष्म उद्योजकतेचा विकास कसा साधायचा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशी माहिती गांधी यांनी दिली. लेटर ऑफ इंटेट मुळे होतकरू तरुणांसाठी सुसज्ज प्रयोगशाळा, स्वयंरोजगार संधी, भांडवल आणि पाच वर्षासाठी सहकार्य मिळणार आहे अशी माहिती समिधा गांधी यांनी यावेळी दिली.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite