Peoples Media Pune header

Go Back

वारकरी महिलांना साडी-चोळी वाटप,व भोजन समारंभ

19 Jun 2017

सुकांता चॅरिटेबल ट्रस्ट व जय आनंद ग्रुपच्या विजयकुमार मर्लेचा परिवाराच्या  वतीने ७५ वारकरी महिलांना साडी-चोळी वाटप नगरसेविका मानसीताई देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.नातेपुते येथील दिंडी क्रमांक ९३ चे सुमारे १५० वारकरी कार्यक्रमात सहभागी झाले होते.सर्वानी स्नेहभोजनाचा लाभ घेतला,या प्रसंगी विजयकुमार मर्लेचा,शांतीलाल नवलखा(कार्याध्यक्ष जय आनंद ग्रुप),प्रमोद छाजेड,संजय कटारिया,प्रकाश गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रम प्रसंगी मानसी ताई कुर्लेकर यांनी अवयवदान विषयी मार्गदर्शन केले.व यासम्बन्धी पुस्तिकेचे प्रकाशन केले.प्रकाश पटवर्धन यांनी गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण केले.  

छायाचित्र :वारकरी महिलांना साडी-चोळी वाटप करताना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite