Peoples Media Pune header

Go Back

ह्युमॅनिटी संस्थेच्या वतीने अंध विद्यार्थ्यासह रोजा इफ्तार

19 Jun 2017

ह्युमॅनिटी अ हेल्पिंग हँड संस्थेच्या वतीने व्हिजन स्कूल मधील ३५ अंध विद्यार्थ्यांसोबत रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष कुमेल रजा,बहाउद्दीन शेख यांनी याचे आयोजन केले.प्रमुख पाहुणे कोंढवा पोलीस स्टेशनचे पो.नि.सतीश गोवेकर होते.अलहदुलील्ला हॉटेल कोंढवा यथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मनजित विरदी,मौलाना क्वारी इद्रीस,हाजी फिरोज,इसाकभाई पानसरे,रईस सुंडके,दादा लोणकर,संजय कांबळे,तात्या जगताप,मुर्तुझा शेख,आरिफ खान,उबेद सय्यद,शाहरुख शेख,अबू शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :डावीकडून इसाकभाई पानसरे,दादा लोणकर,कुमेल रजा,सतीश गोवेकर,क्वारी इद्रीस व विद्यार्थी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite