Peoples Media Pune header

Go Back

डिस्ट्रीक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटिव्ह पदी प्रतिक जोशी यांची निवड.

03 Jul 2017

रॉटरॅक्ट प्रतिक जोशी यांची डिआरआर म्हणजेच डिस्ट्रीक्ट रोटरॅक्टर रिप्रेझेंटिव्ह पदी निवड करण्यात आली.मावळते डिआरआर अर्जुन देव यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.पॅनकार्ड क्लब येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी माजी प्रांतपाल रो.प्रशांत देशमुख व रो.सुभाष सराफ,भावी प्रांतपाल रो.रवी धोत्रे, रॉटरॅक्ट आदित्य जाधव(डिस्ट्रीक्ट रोटरॅक्ट सेक्रेटरी),यश विखणकर(प्रसिद्धी प्रमुख), रोटरॅक्ट ध्रुव गुजराती(भावी डिआरआर)आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरॅक्टर,पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.एकूण ५४ रोटरॅक्ट क्लब कार्यरत असून सुमारे १५०० तरूण रोटरॅक्ट यात सहभागी आहेत.या प्रसंगी बोलताना माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख यांनी रोटरॅक्टर्सनी सामाजिक कार्य करताना देश-मंदिर निर्माण करीत आहेत अशी भावना ठेवावी असे सांगितले.नवनिर्वाचित डिआरआर प्रतिक जोशी यांनी रॉटरॅक्टचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष(५०वे) असून या काळात शैक्षणिक,व पर्यावरण विषयक प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.

छायाचित्र ;युवा रोटरॅक्टर कार्यकारिणी व मान्यवर यांचे समूह चित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite