Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब पुनाच्या अध्यक्षपदी प्रकाश तेलंग यांची निवड

04 Jul 2017

रोटरी क्लब ऑफ पूनाच्या अध्यक्षपदी रो.प्रकाश तेलंग यांची निवड करण्यात आली.त्यांनी मावळते अध्यक्ष रो धरमबीर तनेजा यांच्या कडून सूत्रे स्वीकारली.सेक्रेटरीपदी जमशेद खुर्सीगार यांची निवड करण्यात आली त्यांनी मावळते सेक्रेटरी साहेब सरन यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.बोटक्लब येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल रो.अभय गाडगीळ,माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख,रो.दीपक शिकारपूर(माजी प्रांतपाल),या प्रसंगी बोलताना अभय गाडगीळ यांनी रोटरी क्लबने समाजाची प्रगती व्हावी यासाठी शिक्षण,पर्यावरण,आरोग्य,आदी प्रकल्प राबवावेत असे सांगितले.नवनिर्वाचित अध्यक्ष रो.प्रकाश तेलंग यांनी पुना क्लब हा पुण्यात स्थापन झालेला पहिला व ब्रिटीशकालीन क्लब आहे.आजवर त्याने असंख्य सामजिक प्रकल्प राबविले असून आगामी काळात ही परंपरा पुढे नेणार असल्याचे सांगितले

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite