Peoples Media Pune header

Go Back

“सहकार क्षेत्राच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी,योग्य कार्यास खीळ बसू देणार नाही”मा.गुलाबराव पाटील

08 Jul 2017

सहकार क्षेत्रात अनेक संस्था उत्तम कार्य करीत आहेत,महाराष्ट्रात १,९६,०००हजार सहकारी संस्था असून सुमारे ५ कोटी लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संलग्न आहेत,चांगले काम करणा-या संस्थांच्या पाठीशी शिवसेना शिव सहकार सेनेच्या माध्यमातून खंबीरपणे उभी आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.शिव सहकार सेनेच्या जिल्हास्तरीय शिबिरात ते मार्गदर्शन करीत होते.ओकेजन लॉन्स पाषाण येथे झालेल्या या शिबीर प्रसंगी आयोजक बाळासाहेब भांडे(जिल्हा अध्यक्ष शिव सहकार सेना),शिल्पाताई सरपोतदार(अध्यक्ष शिव सहकार सेना),मनोहर गायके(सरचिटणीस शिव सहकार सेना),सत्यवान उभे(जिल्हा संपर्क प्रमुख),निर्मलाताई केंढे(महिला आघाडी),नारायण सुमंत(कवी),राम कदम(खडकवासला निरीक्षक),टेमघरे(जिल्हाप्रमुख)सुरेश मारणे,अनिल विटेकर,सागर काटकर,सचिन साठे,विजय केदारी,दिलीप मुरकुटे,प्रकाश भेगडे,मयूर भांडे,संतोष बुचडे,राम गायकवाड,स्वाती ढमाले,माऊली केमसे,राजेश निवंगुणे,आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.या वेळी बोलताना शिल्पाताई सरपोतदार यांनी काही जण आपल्या मर्जीनुसार सहकार क्षेत्र संपविण्याच्या प्रयत्नात आहे असे सांगितले बाळासाहेब भांडे यांनी आगामी काळात शिव सहकार संघटना विस्तार करून सहकार क्षेत्राचे हित रक्षण करणार आशयाचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश आरेकर यांनी केले

छायाचित्र डावीकडून:निर्मलाताई केंढे,शिल्पाताई सरपोतदार,बाळासाहेब भांडे,गुलाबराव पाटील,सत्यवान उभे मनोहर गायके,दत्तात्रय टेमघरे

बाळासाहेब भांडे 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite