Peoples Media Pune header

Go Back

प्रमोद भंडारी यांची रोटरी क्लब सिंहगडच्या अध्यक्षपदी निवड

09 Jul 2017

रोटरी क्लब सिहगडच्या अध्यक्षपदी रो.प्रमोद भंडारी यांची निवड करण्यात आली.रो.नितीन चावरे यांचे सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली.लक्ष्मीकांत मांगले यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली.कर्वेनगर येथील भानूबेन नानावटी आर्किटेक्ट कॉलेजच्या सभागृहात झालेल्या समारंभात माजी प्रांतपाल रो.डॉ.दीपक शिकारपूर यांच्या हस्ते त्यांनी पदभार स्वीकारला.तसेच कार्यकारिणीतील पुढील सभासदांनी पदभार स्वीकारला डॉ.श्रीकांत पाटणकर,श्रीकांत बेडेकर,अलका देशपांडे,संजय इनामदार,लता शिंदे,शरद लागू,मिलिंद बिवलकर,वेकटेश चौलवार,सुधीर दफ्तरदार,अनुराधा काळे,नयना मोकाशीं,

    या नवीन वर्षात मुळशी तालुक्यातले होतले हे गाव स्वयंपूर्ण(स्मार्ट व्हिलेज) करण्याबरोबरच इतर ५० खेडेगावात वॉटर ATM मशीन बसविण्याचा संकल्प आहे.या बरोबरच पाणी बचत,विहिरी पुनर-जलीकरण,शोषखड्डे निर्मिती,प्लास्टिक व इतर कचरा नियोजन,समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी मेडिकल चेक-अप,वृक्षारोपण,रक्तदान शिबिरे,युवापिढीसाठी मार्गदर्शन आदी उपक्रम राबविणार असल्याचे प्रमोद भंडारी यांनी नमूद केले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite