Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब हेरिटेजच्या वतीने महादान उपक्रम

09 Jul 2017

रोटरी क्लब हेरीटेजच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात महादानउपक्रमाचे आयोजन केले.यात रक्तदान शिबीर,धान्यदान,अवयवदान जनजागृती,पुस्तके,कपडे,रद्दी खेळणी,इत्यादींचा समावेश होता.रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब हेरीटेजचे अध्यक्ष रो.डॉ.अमित मुंगळे,सेक्रेटरी संगीता काकडे,प्रोजेक्ट डायरेक्टर विनय नेवसे अनिल गोविलकर,लीना गोगटे,स्वप्ना कानिटकर,मधुमिता बर्वे,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रो.डॉ.अनिल परमार,जिज्ञासू मेहता,उज्ज्वला बर्वे,दिलीप देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.ससून रक्तपेढीने रक्तदान शिबिराचे तांत्रिक संचालन केले.जमा झालेले दानरुपी मदत ही मातोश्री वृद्धाश्रम,पसायदान,उस तोडणी कामगार,ग्रामीण शाळा,वसतीगृह,आदी ठिकाणी वितरीत करण्यात येईल असे अध्यक्ष अमित मुंगळे यांनी नमूद केले.

छायाचित्र:मातोश्री वृद्धाश्रमास मदत प्रदान करताना पदाधिकारी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite