Peoples Media Pune header

Go Back

पर्यावरण रक्षणासाठी देवराई व घनवन.

03 Jun 2023

सध्याच्या युगात वृक्षतोडीमुळे अनंत समस्या निर्माण झाल्या.पारंपरिक अशा देवराया या नष्ट होत चालल्या आहेत.त्यासाठी देवराई फाउंडेशनच्या वतीने “मानव निर्मित देवराई”व “घनवन” या दोन बाबी पर्यावरण संवर्धंनासाठी सर्वांना उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये मानव निर्मित देवराई साठी एक एकर जागेत ११९ प्रकारच्या ५१५ वनस्पती व त्या लागवडीचा आराखडा ही विनामूल्य दिला जाणार आहे.तर घनवन हे एक गुंठा पासून सुरू करता येते.यात ३ फुट खड्डा करून त्यात प्लॅस्टिक सोडून अन्य कुजणारा कुठलाही कचरा भरून त्यावर १ फुट माती भरून १ मीटर आंतरावर देशी वृक्ष लावून कमीत कमी खर्चात घनवन तयार करता येते.

     देवराई फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र,कर्नाटक गोवा,बडोदा येथे सुमारे २०० मानवनिर्मित देवराया लागवड केल्या आहेत.आगामी काळात १००० देवराई करण्याचा संकल्प आहे.वृक्ष तोडी मुळे क्लायमेट चेंज झाला आहे.याला पर्याय म्हणून प्राचीन परंपरेतील देवराईची निर्मिती व्हावी यासाठी देवराई फाउंडेशनच्या वतीने विनामूल्य रोपे व मार्गदर्शन केले जाणार आहे.तरी या सुवर्ण संधीचा संस्था व व्यक्तींनी लाभ घ्यावा असे देवराई फाऊंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी रघुनाथ ढोले व सल्लागार हितेंद्र सोमाणी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार परिषदेत केली. अधिक माहिती साठी संपर्क rmdhole@gmail.com

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite