Peoples Media Pune header

Go Back

डॉ.समता कुलकर्णी व सो.मधुसूदन घाणेकर यांना लघुपटास आंतरराष्ट्रीय पुरस्कार.

15 Jul 2017

सीमा फोल्म्स प्रस्तुत करो ना प्यार जराया लघुपटास ग्लोरियस इंटरनॅशनल पॅरीस तर्फे गोल्डन लीफ इंटरनॅशनल अॅवार्ड प्राप्त झाला.समता कुलकर्णी यांना दिग्दर्शन,अभिनय व नेपथ्य यासाठी तसेच डॉ.मधुसूदन घाणेकर यांना गीत,संगीत आणि पार्श्वगायनासाठी हा पुरस्कार मिळाला.नेक्सजेन इन्वेंटिव्ह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे सी.एम.डी.अभिषेक कुमार बर्मन यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.नेक्सजेन ग्रुप ऑफ कंपनीजच्या कसबापेठ येथील मुख्यालयात झालेल्या या कार्यकम प्रसंगी डायरेक्टर शबनम प्रवीण,ज्योती लिमये आदी मान्यवर उपस्थित होते.मुलाला आई वडीलांकडून पुरेसा वेळ न दिला गेल्याने होणारी कुचंबणा या लघुपटाने अत्यंत प्रभावीरित्या मांडली असल्याचे कौशिक बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले.यापूर्वी डॉ.मधुसूदन घाणेकर आणि डॉ.समता कुलकर्णी यांना पाऊस लघुपटासाठी सुद्धा पुरस्कार मिळाले आहेत.डॉ.घाणेकर यांच्या नावावर नक्षत्र डॉटकॉमया चित्रपटासाठी विश्वविक्रम नोंदवला गेला आहे.

छायाचित्र :डावीकडून डॉ.समता कुलकर्णी,डॉ.मधुसूदन घाणेकर ,अभिषेक कुमार बर्मन,व शबनम प्रवीण 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite