Peoples Media Pune header

Go Back

“आधुनिक भारताचा असामान्य उदय”. सौरभ मुखर्जी यांचे रोटरी क्लब, शुक्रांगणच्या वतीने मार्गदर्शन.

04 Jun 2023

रोटरी क्लब बिबवेवाडी,प्राईड,लोकमान्य नगर,विज्डम,पुना वेस्ट,सिनर्जी,सारसबाग,युनिव्हार्सिटी,सहवास,गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने “आधुनिक भारताचा असामान्य उदय या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. मार्सेलस इन्व्हेस्टमेंटचे सीईओ सौरभ मुखर्जी यांनी मार्गदर्शन केले. सिंबॉयसिसच्या रेंजहिल येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल रो.डॉ.अनिल परमार,रोटरी प्राईडचे अध्यक्ष उज्ज्वल केले,रोटरी बिबवेवाडीचे अध्यक्ष वर्धमान गांधी,रोटरी लोकमान्य नगरच्या अध्यक्ष मधुरा विप्र,विज्डमच्या अध्यक्ष वैशाली वर्णेकऱ,रोटरी पुना वेस्टच्या भाग्यश्री भिडे,रोटरी सिनर्जीच्या अध्यक्ष अर्चना संघवी,रोटरी सारसबागचे अध्यक्ष भुषण कुलकर्णी. आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना सौरभ मुखर्जी यांनी भारतीय लोक गुंतवणूक म्हणजे फ्लॅट,सोने,फिक्स डिपॉझीट ,एलआयसी मध्ये गुंतवणूक करतात मात्र यात महागाई निर्देशांका प्रमाणे वाढ होत नाही,म्हणजेच फायदा मिळत नाही,शेअर बाजारात योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास कैक पटीने नफा होतो असे प्रतिपादन केले. 

 

छायाचित्र : कार्यक्रम प्रसंगी मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite