Peoples Media Pune header

Go Back

गुंडाळवाडी गावास सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन प्रदान.प्राची देशपांडे व सोनाली कुलकर्णी यांचा उपक्रम

17 Jul 2017

ग्रामीण भागातील खेड तालुक्यातील गुंडाळवाडी गाव व अन्य ठिकाणी महिलांच्या सुविधेसाठी सॅनिटरी नॅपकीन वाटप मशीन व त्याची योग्य विल्हेवाट लागावी यासाठी इन्सीरेटर(ज्वलन मशीन)देण्याच्या मदतीसाठी.प्राची देशपांडे यांनी रिगेन इंटरपीस(मनशांती परत मिळविणे)या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यातील नफ्यातून त्याच कार्यक्रमात सुमारे १५००००(दीड लाख)रुपयाच्या या मशीन्स हस्तांतरित करण्यात आले.कलमाडी हायस्कूल(KHS)सभागृह एरंडवणा येथे संपन्न होईल झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्राची देशपांडे(स्ट्रेस मनेजमेंट एक्स्पर्ट),सोनाली कुलकर्णी (सिने अभिनेत्री),रो अजय वाघ(सिनियर डिस्ट्रीक्ट ऑफिसर),रो.भरत गुरव,रो.दीपक तोष्णीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रम प्रसंगी प्राची देशपांडे व सोनाली कुलकर्णी यांनी ताणतणाव व्यवस्थापन व मनशांती कशी मिळवावी याबाबत मार्गदर्शन केले.त्यावेळी बोलताना त्यांनी तन तणावरहित जीवन अशक्य आहे.ते येणारच मात्र सकारात्मक विचार व आत्मविश्वास याने त्यावर मात करता येते असे सांगितले.

छायाचित्र :डावीकडून अजय वाघ,भरत गुरव,प्राची देशपांडे सोनाली कुलकर्णी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite