Peoples Media Pune header

Go Back

रोटरी टिळकरोडच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

19 Jul 2017

रोटरी क्लब ऑफ पुणे टिळकरोड तर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया(Cataract Surgeries)प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.यात सुमारे ५० जणांवर ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.सरपोतदार आय हॉस्पिटल कोथरूड येथे झालेल्या उद्घाटनप्रसंगी प्रांतपाल अभय गाडगीळ,क्लबचे अध्यक्ष रो.चंद्रकांत डांगे,सचिव रो.महेंद्र शहा,प्रकल्प प्रमुख चारुदत्त भावे तसेच उष:काल प्रतिष्ठानचे श्री मदन गोडसे,आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य उपस्थित होते.या सर्व ५० शस्त्रक्रिया सरपोतदार नेत्र रुग्णालयात डॉ.निर्मला सरपोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत.नियोजित अध्यक्ष श्रीकांत सरपोतदार यांनी आभार प्रदर्शन केले.

छायाचित्र :नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया प्रकल्प उद्घाटनप्रसंगी सर्व मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite