Peoples Media Pune header

Go Back

आदित्य ठाकरे यांनी केली पुण्यातील मानाच्या गणपतीची आरती

28 Aug 2017

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले  आरती केली.सर्वप्रथम पुण्याचे ग्रामदैवत व पहिला मानाचा गणपती श्री कसबा गणपतीचे दर्शन घेतले व आरती केली.तसेच तांबडी जोगेश्वरी,श्रीमंत दगडूशेठ हलवाई,गुरुजी तालीम,अखिल मंडई,व केसरीवाडा  येथे पूजा व आरती केली.या प्रसंगी शिवसेना उपनेत्या व प्रवक्ता आ.डॉ.नीलमताई गो-हे,संपर्कप्रमुख उदय सावंत,राजेंद्र शिंदे(मा.उपशहर प्रमुख),किरण साळी(युवासेना),नगरसेवक विशाल धनवडे,नगरसेविका पल्लवी जावळे,तम्मा विटकर(विभाग प्रमुख) श्रीधर पाटणकर,सौ.पाटणकर,संतोष गोपाल,मनीष जगदाळे आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी,शिवसैनिक,महिला आघाडी कार्यकर्त्या व नागरिक उपस्थित होते.कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे,केसरीवाडा येथे महापौर मुक्ताताई टिळक,रोहित टिळक,शैलेश टिळक यांनी स्वागत केले.यावेळी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र व मराठी माणसाची भरभराट होवो,शेतकरी सुखी होवो,व महिलांना व सर्वाना सुरक्षीत व सन्मानाचे जीवन लाभो अशी गणेश चरणी प्रार्थना केल्याचे सांगितले.

छायाचित्र :आदित्य ठाकरे,नीलमताई गो-हे व पदाधिकारी ग्रामदैवत पहिला मानाचाश्री कसबा गणपतीची आरती करताना 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite