Peoples Media Pune header

Go Back

रोटरीच्या वतीने गणेशभक्तांसाठी कसबा गणपती मोफत शुध्द पाणी यंत्र

31 Aug 2017

सध्या गणेसोत्सव सुरु असून हजारो नागरिक गणपती पाहण्यास येत असतात.मात्र सर्वांनाच मिनरल वॉटर घेणे शक्य नसते.यासाठी रोटरी क्लब सिह्गडच्यावतीने पुण्याचे शिवकालीन ग्रामदैवत श्री कसबा गणपती येथे मोफत शुध्द पाण्यासाठी यंत्र(किमत सुमारे २ लाख) बसविले आहे यातून एका तासात सुमारे ३०० लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होते.याचे उद्घाटन प्रांतपाल रो,अभय गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी रोटरी सिंह्गडचे अध्यक्ष अशोक भंडारी.प्रकल्प प्रमुख अशोक खाडे,श्रीकांत शेटे,रो.लता शिंदे,निलेश वकील,अनिल पानसे,अमोल पंढरपूरे.आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य व नागरिक उपस्थित होते.यावेळी बोलताना अशोक भंडारी यांनी अनेक आजार हे दुषित पाण्यातून होतात.शुध्द पाणी ही नागरिकांची गरज असून या प्रकल्पा मुळे उत्सव काळात नागरिकांना भरपूर व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले.सतीश खाडे यांनी शुद्ध पाणी मिळाल्याने मिनरल वॉटरचा वापर कमी होईल व प्लास्टिकचा वापर कमी होऊन नागरिकांच्या पैशाची बचत होईल असे सांगितले  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite