Peoples Media Pune header

Go Back

पुण्यातील पहिल्या जीएसटी सुविधा केंद्राचे उद्घाटन

02 Sep 2017

राधे राधे जीएसटी सोल्युशनच्या पुण्यातील पहिल्या जीएसटी सेवा केंद्राचे उद्घाटन नरेंद्र सोनवणे(प्रेसिडेंट ऑफ वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन) यांच्या हस्ते करण्यात आले.संत कबीर चौक,नानापेठ,पोस्ट ऑफिस जवळील दुकान क्र १ येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पवन सराफ(डायरेक्टर पॉपकॉर्न इन्फोटेक),विजल शाह(डायरेक्टर राधेराधे सोल्युशन्स),जयेश शाह(राधे राधे सोल्युशन्स),जिग्नेश केसरिया(केंद्रचालक).आदी मान्यवरांच्या बरोबरच या क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते.या केंद्रात जीएसटी संबंधी रजिस्ट्रेशन,रिटर्न फायलिंग,बुककीपिंग अशी सर्व कामे माफक शुल्कात केली जातील.कार्यालयाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ७ अशी आहे.उद्घाटनप्रसंगी बोलताना नरेंद्र सोनवणे यांनी जीएसटी साठी अशा सुविधा केंद्रांची गरज आहे.यामुळे छोटे-मोठे व्यावसाईक,दुकानदार व नागरिक यांना योग्य सुविधा मिळेल असे सांगितले.पवन सराफ यांनी आगामी काळात सर्वत्र अशी सुविधाकेंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.अधिक माहिती साठी vijalshah@rrgsts.com 

छायाचित्र :जीएसटी सुविधा केंद्राचे उद्घाटन करताना नरेंद्र सोनवणे,पवन सराफ,विजल,शाह,जयेश शाह,जिग्नेश केसरिया व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite