Peoples Media Pune header

Go Back

गणेशोत्सवात वाहतूक नियंत्रण करणा-या ९० स्वयंसेवकांचा सत्कार

07 Sep 2017

नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात रोटरी क्लब शनिवारवाडा व सिहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचा राष्ट्रीय सेवा योजना(NSS)यांच्या संयुक्त विद्यमाने १ सप्टेंबर ते ४ सप्टेंबर या कालावधीत डेक्कनजिमखाना व कर्वेरोड येथील ६ महत्वाच्या चौकात वाहतूक नियंत्रण करण्यात आले.यात सुमारे ९० स्वयंसेवकांनी पोलिसांच्या सहकार्याने भाग घेतला.संध्याकाळी ६ ते ९ या काळात त्यांनी वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना सहाय्य केले.या स्वयंसेवकांचा सत्कार रोटरीच्या वतीने डेक्कनजिमखाना वाहतूक टर्मिनल येथे करण्यात आला.या प्रसंगी माजी प्रांतपाल विलास जगताप,ट्राफिक विभागाचे एपीआय सुभाष जाधव,रोटरी शनिवारवाडाचे अध्यक्ष संजय कुलकर्णी,सेक्रेटरी शाम ढवळे,प्रकल्प प्रमुख सुभाष दांडेकर,राधिका खांडेकर,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रभाकर देसाई आदी मान्यवर व ९० राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना विलास जगताप यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबरच सामाजिक शिक्षण घेतले पाहिजे असे सांगितले.विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना वाहतूक नियमन किती आवघड आहे हे आता समजले व आपण नियम न पाळणे चुकीचे आहे.तसेच पोलिसांच्या कार्याविषयी आदर वाढला असून यापुढे नियमभंग करणार नाही असे सांगितले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite