Peoples Media Pune header

Go Back

सुरभी मोरे यांनी जिंकला “मिस पुणे फेस्टिव्हल”चा किताब

07 Sep 2017

नुकत्याच झालेल्या पुणे फेस्टिव्हल मध्ये आयोजित सौंदर्य स्पर्धा सुरभी मोरे यांनी जिंकून मिस पुणे फेस्टिव्हलचा किताब पटकवला.तर फाल्गुनी झेंडे यांनी द्वितीय व नेहा जैन यांनी तृतीय क्रमांक पटकवला.यात व्यक्तिमत्व,बुद्धिमत्ता,सौंदर्य,सर्वसाधारण ज्ञान,आणि जीवनाबद्दलचा दृष्टीकोन आसे निकष होते.स्पर्धेचे संयोजन सुप्रिया ताम्हाणे यांनी केले.गणेश कलाक्रीडा रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी,मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे,डॉ,सतीश देसाई,काका धर्मावत,मोहन टिल्लू,संतोष उणेचा, कोरिओग्राफर जुई सुहास(संयोजन),आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेचे परीक्षण अभिनेता समीर धर्माधिकारी,अभ्यंग कुवळेकर,चित्रपट निर्माते विनय गानू,दिग्दर्शक प्रशांत सोलापूरकर,व २०१६ च्या मिसेस महाराष्ट्रडॉ.राधिका वाघ यांनी केले.या स्पर्धेचे औचित्य साधून क्विक हिलचे सीटीओ संजय काटकर,आणि सुप्रसिद्ध संगीतकार विश्वजित यांनी ड्रीम बुक प्रोडक्शन व वेदार्थ क्रिएशन निर्मित मंत्र या आगामी चित्रपटाची घोषणा केली.कार्यक्रमास नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite