Peoples Media Pune header

Go Back

रोटरी कात्रज तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार

11 Sep 2017

रोटरी क्लब कात्रज तर्फे शिक्षक दिनानिमित आदर्श शिक्षक पुरस्कार (नेशन बिल्डर अॅवॉर्ड)प्रदान करण्यात आले. दिनकरराव धाडवे पाटील सारोळे शाळेचचे संपत दुरकर व लक्ष्मण भांगे,मुक्तांगण इंग्लिश स्कूलच्या अनुपमा गुजराथी,सीआर रंगनाथन डिफ स्कूलचे महेश कांबळे,प्रिझम फौंडेशनचे,विकास जगताप यांना प्रदान करण्यात आले.शाल श्रीफळ,मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.मुक्तांगण शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रीक्टच्या फर्स्ट लेडी दीपा गाडगीळ होत्या.शिक्षकांच्या कार्याची माहिती रो.मनीषा तिकोने यांनी दिली.या प्रसंगी रोटरी कात्रजचे अध्यक्ष विभाकर रामतीर्थकर,सचिव समीर प्रभुणे,श्री मोडक सर,अंजली सहस्रबुद्धे,रावसाहेब पटवर्धनचे प्राचार्य कांबळे सर,मुक्तांगणच्या प्राचार्या केणी मॅडम, श्री व सौ धाडवे पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय काळे यांनी केले.नियोजित अध्यक्ष अनंत तिकोने यांनी आभार प्रदर्शन केले.

छायाचित्र : पुरस्कारार्थी व मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite