Peoples Media Pune header

Go Back

मेक इन इंडिया अंतर्गत जपानी कंपनीचे “डोको”दुचाकी संरक्षक बाजारात

12 Sep 2017

मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील मेक इन इंडिया अतर्गत जपानी कंपनी डेन्सोने डोकोहे दुचाकी चोरी प्रतिबंधक उपकरण बाजारात आणले आहे.याचे संशोधन व निर्मिती पूर्णतः भारतात केली गेली आहे.याचे उद्घाटन हॉटेल सागर प्लाझा कॅप येथे नुकतेच करण्यात आले.या प्रसंगी डेन्सो मुख्य अधिकारी भरत राठी,सुरिंदरसिंग(प्रोडक्ट हेड),वितरक अश्विन शहा(अंकित सेल्स),आदी मान्यवरांच्या बरोबरच पुण्यातील दुचाकी वितरण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुण्यात व देशात दुचाकीचे प्रमाण वाढत आहे.व दुचाकी चो-या सुद्धा वाढत आहे.१ मोशन सेन्सर,१ आलार्म व २ रिमोट चावी असलेल्या डोको या सिस्टीम मुळे चोरीस प्रभावी प्रतिबंध बसतो.कार्य यात मालका व्यतिरिक्त कोणी चावी लावल्यास वाहन सुरु होत नाही व आलार्म वाजतो.तसेच मॉल व अन्य गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेली गाडीही शोधता येते.या यंत्रणेची किमत १४९० आहे असे आश्विन शहा यांनी नमूद केले.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite