Peoples Media Pune header

Go Back

“महिलांना नुसते आरक्षण नको तर त्यांच्या अधिकाराचे सुद्धा संरक्षण पाहिजे”आ.डॉ.नीलमताई गो-हे

17 Sep 2017

महिलांच्या अथक संघर्षामुळे त्यांना आरक्षण मिळाले आहे.राजकीय आरक्षणा मुले त्यांना लोकसभा,विधानसभा,महापालिका इत्यादी ठिकाणी आरक्षण मिळाले आहे.मात्र आरक्षण हेच ध्येय नाही तर ते एक साधन आहे.महिलांच्या मानवी अधिकारांचे संरक्षण झाले पाहिजे,जागतिकीकरणाच्या आजच्या युगात सर्वच क्षेत्रात महिलांचे प्रमाण ५०% हवे यादिशेने पावले पडत आहेत.मात्र असंघटीत क्षेत्रात महिलांचे प्रमाण ६०% हून अधिक आहे.म्हणजेच त्यांच्या शोषणाची शक्यता वाढते.आरक्षणात सर्वसाधारण महिलांनाही प्राधान्य हवे.राजकीय क्षेत्रात अधिक महिलांनी प्रवेश केला पाहिजे.यासाठी समाजाची मानसिकता बदलली पाहिजेअसे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ता आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले.त्या मेहता पब्लिशिंग हाउस फौंडेशनच्या वतीने देण्यात येणा-या रुचिराकार कमलाबाई ओगलेपुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षस्थानी बोलत होत्या.या प्रसंगी प्रमुख पाहुण्या पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक,फौंडेशनचे अध्यक्ष सुनील मेहता,प्रसन्न ओगले.व सत्कारार्थी सुवर्णा तळेकर,भारतबाई देवकर,व अर्चना जतकर,आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.

नीतू मांडके सभागृह येथे झालेल्या  या समारंभात शरयू दाते,चिन्मयी गोस्वामी ऐश्वर्या सावंत या मुलींचा यंग अचिव्हर्सपुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शाल श्रीफळ,स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी बोलताना मुक्ताताई टिळक यांनी भारतातच नव्हे तर विकसित देशातील महिला राजकारण्यांना ही लैंगिक भेदभावाचा सामना करावा लागतो.भारतात महिलांचे  आर्थिक सक्षमीकरण व्हावेच पण योग्य ते शारीरिक पोषण व सक्षमीकरण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली

छायाचित्र :डावीकडून प्रसन्न ओगले,अर्चना जतकर,मुक्ताताई टिळक,नीलमताई गो-हे,भारतबाई देवकर,सुवर्णा तळेकर,सुनील मेहता.

 

नंदकिशोर लोंढे  

 

P.R. राजेंद्र सोनार 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite