Peoples Media Pune header

Go Back

रोटरी शनिवारवाडाच्या वतीने १३ शिक्षकांना “राष्ट्रनिर्माता”पुरस्कार

19 Sep 2017

रोटरी क्लब शनिवारवाडाच्यावतीने ग्रामीण,दुर्गम,शहरी,भागातील १३ शिक्षकांचा राष्ट्रनिर्मातापुरस्काराने गौरव करण्यात आला.यात केजी ते पीजी स्तरावर कार्य करणा-या शिक्षकांचा समावेश होता.रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ.प्रमोद जेजुरीकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.शाल श्रीफळ,स्मृतिचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते.मराठा चेंबर्सच्या टिळकरोड यथे झालेल्या या समारंभ प्रसंगी माजी प्रांतपाल प्रमोद जेजुरीकर,रोटरी शनिवारवाडाचे अध्यक्ष रो.संजय कुलकर्णी,सेक्रेटरी रो.शाम ढवळे,प्रकल्प प्रमुख अपर्णा रानडे आदी मान्यवरांच्या बरोबरच शिक्षकवर्ग व रोटरी सदस्य उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना प्रमोद जेजुरीकर यांनी देशात मोठी विषमता आहे.मात्र ती दूर करण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षणात आहे.आज विकसित तंत्रज्ञानाने माहिती तर अफाट उपलब्ध होते.पण तिचा सुयोग्य वापर शिक्षकवर्गाने शिकवला पाहिजे असे सांगितले.  

छायाचित्र;सत्कारमूर्ती शिक्षकगण व मान्यवर यांचे समूह चित्र  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite