Peoples Media Pune header

Go Back

कृष्ण देशमुख य़ांच्या कडून राष्ट्रसंत प.पू.डॉ.श्री भैय्युजी महाराज ह्यांच्या सदगुरु दत्त धार्मिक एवम पारमार्थिक ट्रस्ट इंदौर ह्या संस्थेंतर्गत अनेक सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य,शेती ह्या क्षेत्रात कार्य आणि सेवा

21 Sep 2017

कृष्ण देशमुख(पुणे प्रतिनिधी) य़ांच्या कडून राष्ट्रसंत प.पू.डॉ.श्री भैय्युजी महाराज ह्यांच्या सदगुरु दत्त धार्मिक एवम पारमार्थिक ट्रस्ट इंदौर ह्या संस्थेंतर्गत अनेक सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य,शेती ह्या क्षेत्रात कार्य आणि सेवा सूर्योदय परिवरांतर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात इत्यादी ठिकाणी सुरु आहे. "संविधान जागरण" हा त्यातीलच एक उपक्रम असून तो दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी राबवला जातो. ह्या मागचा उद्देश असा आहे की भारतीय संविधानाची माहीती, नागरिकांचे अधिकार, मूलभूत हक्क व कर्तव्य जनसामांन्यापर्यंत पोहचले पाहिजे हा आहे. आत्ता पर्यंत जवळपास 1800000 विद्यार्थ्यांची परीक्षा घेतलेली असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. ह्यासाठी शाळांमध्ये जाऊन परीक्षेसाठी लागणारी अभ्यासपुस्तिका, प्रश्न-उत्तरपत्रिका व प्रमाणपत्र संस्थेमार्फत प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत दिले जाते अशी माहीती सूर्योदय परिवार पुणेचे आश्रम प्रमुख अध्यक्ष श्री विवेक कोंडे व श्री कौस्तुभ वडनेरे ह्यांनी दिली. ह्या उपक्रमांतर्गत नामदेवराव मोहोळ विद्यालय व क्रीडा प्रतिष्ठान पुणे ह्या संस्थेच्या वारजे माळवाडी विठलनगर मधील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दिनांक 4 सप्टेंबर 2017 रोजी "संविधान जागरण" ची परिक्षा घेण्यात आली. 110 विद्यार्थी ह्या परिक्षेस बसले अशी माहीती शाळेचे मुख्याध्यापक श्री के व्ही सूर्यवंशी सरांनी व त्यांचे सहकारी शिक्षक वर्ग एस बी पवार ताई, एस एन भामरे सर, बी बी मारणे सर, एस व्ही शेंडकर सर व्ही बी कुम्भार ताई, के आर डुम्बरे ताई ह्यांनी दिली. शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री मा.खा.अशोकराव मोहोळ साहेबांनी ह्या उपक्रमाबद्दल सूर्योदय परिवार व ट्रस्ट चे विशेष कौतुक केले. ह्या उपक्रमासाठी वारजे येथील संस्कार मंदिर संस्थेचे सचिव श्री विशाल थोरात ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite