Peoples Media Pune header

Go Back

शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी “ऋणानुबंध सैनिकांशी –कारगिल शौर्यगाथा”चे आयोजन

25 Sep 2017

शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी रोटरी क्लब हेरीटेजच्या वतीने ऋणानुबंध सैनिकांशी –कारगिल शौर्यगाथा-अनुराधा प्रभुदेसाई.या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड येथे रात्री ९.३० वाजता संपन्न होईल.अनुराधा प्रभुदेसाई या कारगिल व तेथील दुर्गम प्रदेशात स्वतः जावून तेथील सैनिक व त्यांच्या कुटुंबासाठी भरीव कार्य करतात.या कार्यक्रमातून मिलणा-या उत्पन्नाचा विनियोग शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी व ससून हॉस्पिटल मधील लहान मुलांच्या वॉर्डासाठी करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे स्वागत तिकीट शुक्ल फक्त ५०० व ३०० आहे.तरी या कार्यक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन रोटरी हेरीटेजचे अध्यक्ष रो.अमित मुंगळे,रो.अविनाश ओगले,रो मोहन चौबळ यांनी पत्रकार परिषदेत केले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite