Peoples Media Pune header

Go Back

शिवसेनेच्या वतीने महाभोंडल्याचे आयोजन

25 Sep 2017

शिवसेना खडकवासला मतदारसंघाच्या वतीने महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले.आजचा देवीचा रंग भगवा असल्याने बहुसंख्य महिला भगव्या रंगाच्या पेहरावात आल्या होत्या.त्यांनी तीन पदरी(तीन रिंगण असलेल्या)भोंडला खेळला.मध्यभागी हत्तीचा छोटा पुतळा होता.यात महिला,तरुणी,व लहानमुली देखील उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.पारंपारिक गाणी व खेळ याने यात रंगत आली.सिंह्गड रस्त्यावरील अभिरुची मॉल टेरेसवर झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक निलेश गिरमे,राधिका गिरमे,अभिनेत्री गिरीजा जोशी,बाल कलाकार पार्थ भालेराव,व श्रेया पासलकर,रमेशबापू कोंडे,शिवाभाऊ पासलकर,राम तोरकडी,किशोर रजपूत,सुरज लोखंडे,गायक दिग्विजय जोशी,सचिन पासलकर,नाना दांगट,युवराज दळवी,समीर बडदे,सुरज देडगे,प्रतिक देडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :तीनपदरी भोंडला खेळताना महिला,तरुणी व लहान मुली 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite