Peoples Media Pune header

Go Back

“महिलांनी अन्याया विरुद्ध संघटीत झाले पाहिजे,तरच न्याय मिळेल”हेमांगीताई वरळीकर

27 Sep 2017

महिलांवर अत्याचार अन्याय वाढत आहेत,महागाईचा फटकाही सर्वात ज्यास्त महिलांना बसतो.या स्वर अन्याय अत्याचाराविरुद्ध महिलांनी एकत्रित येवून दाद मागितली पाहिजे.तरच न्याय मिळेल.असे प्रतिपादन बृहनमुंबई महापालिकेच्या उपमहापौर हेमांगीताई वरळीकर यांनी केले.सिंह्गड रस्ता येथील माँ साहेब नवरात्र उत्सव येथील देवीची आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली तेव्हा त्या बोलत होत्या.या प्रसंगी माँ साहेब नवरात्र उत्सवचे संस्थापक अध्यक्ष संतोष गोपाल,अध्यक्ष किशोर पवार,सचिन मोरे,भरतआबा कुंभारकर,विश्वास  सोडे,नाना मरगळे,दीपक शेंडे,प्रकाश यादव,दत्तानाना रासकर,मोहन जवळकर,रेखा कोंडे,लता मारणे,वैशाली गोपाळ,धनश्री भागवत,अंतरा गुजराथी आदी उपस्थित होते.गेली १३ वर्ष संस्थेच्या वतीने विविध धार्मिक व सामजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात असे  सांगितले 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite